Skip to main content

Posts

आजी आजोबा दिवस

मला  अजुनही  कधितरी  वाटतं  … दार उघडून आत गेल्यावर आजी पेपर वाचत बसली असेल … किंवा दिवाणाशेजारी उभ्या जळीच्या कपाटातून काढत असेल पोथी कदाचित असेल ती “ रूचिरा ” पुस्तकात दिलेल्या वड्या करून बघण्याच्या तयारीत …. किंवा आमच्यासाठी असेल पुस्तकातू तोडगे उतरवून घेत अजोबाही कधितरी असेच आठवतात … त्यांचा चौकोनी चष्मा … दोन रिफिलचं पेन … पाण्यात घातल्यावर जांभळी होणारी शिसपेंसील … आणि तारीख लिहायची त्यांची अपुर्णांका सारखी पद्धत कधी बाल्कनीत उभा असल्यावर उगाच वाटतं की समोर रिक्षा थांबेल आणि आजोबा अपली बॅग घेऊन उतरतील …
Recent posts

Before you learn to swim....

I truly believe that swimmers are not born, they are made, of course except Michael Phelps whose body is a God's gift. If you got past childhood without learning how to swim, it’s very possible that you’re now stricken with fear/embarrassment at the prospect. That makes perfect sense; it’s really hard to learn things as adults that for children require basically no work. Learning "Machine Learning" too is similar to learn swimming as an Adult. It too has its own Math phobias and the tendency to follow the path of least resistance. This article prepares you to swim the ocean of Machine Learning. Essential Mathematics Linear Algebra: In ML, Linear Algebra comes up everywhere. Topics such as Principal Component Analysis (PCA), Singular Value Decomposition (SVD), Eigendecomposition of a matrix, LU Decomposition, QR Decomposition/Factorization, Symmetric Matrices, Orthogonalization & Orthonormalization, Matrix Operations, Projections, Eigenvalues & ...

mi majhaa....

कोणी विचारा मला "मी जगतो कसा?" मी म्हणेन पावातल्या वडाजसा स्वादिष्ट, रुचकर, खमंग असा पोटभर खा वाट्टेलतसा जरी असेल मी पावात दाबलेला चटणी, मिरचीनी तिखट केलेला उकडुन, तळुन, शिजवुन काढलेला तरीही चिन्चा आणि गुळात बुडलेला मज विचारा मी इतका चवदार कसा? मी म्हणेन त्यासाठी आधी कूकर मधे बसा मग उकळत्या तेलात पोहुन घ्या जरासा आणी पावाच्या दाढेत जाऊन बसा समजू नका मजवरी देव कोपला बघा खजुरही वाळवंटी जन्मला जो कोणी आगीतुन नाही निघाला कुन्दनाची सर कधी नाही येणार त्याला

क्षण

त्या संध्याकाळची भेट तुझी अजून स्मरणात आहे मोहरून अवघी काया अजून शहारत आहे केस होते किंचीत ओले.... गालवर ओघळलेले पापण्यान्वर काळ्याभोर.... दवबींदू साचलेले हलकेच होती तुझ्या आली.... गालवरती लाली ओठ तुझे भिजलेले.... माझ्या ओठाखाली! संकोचाने जेव्हा तू... हात सोडवून घेतले झटक्यात वेडे माझ्यातून.... तू मला ओढून घेतले! कस सांगू तुला.... तू काय जादू केली आयुष्यभराची कलकल.... पावसात विरघळून गेली

एक तोळा देशभक्ती

आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो? जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल. दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता. ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत. काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!" काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिह...

लोहगड

लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते. मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड..‌. शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति. मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो. असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला. इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या...

ठाकर

हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन केशरी मातीवर सोनेरी गोन्दून सळसळत्या वार्‍याची सनई धून पोपटी नक्शी एकमेकात गुंफून इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार ठेचांच्या पायावर काट्यांची धार मळकट पातळात लेकराचे घर भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार रोजच यावे इथे लांब दूर दूरून जंगलातली सामग्री न्यावी झोळी भरुन लेकराले पाजवे त्याचेच दुध करुन अन भाकरी खावी त्याचीच कुस्करून देवाले सांगावे "ह्यो जंगलच आमचा आधार, म्हाया लेकरास्नी खेळाया ह्याचेच घरदार, सहरातुन धाडू नगस मिस्त्री नी विंजीनीयार, कराया फाटलेल्या गोणपाटाचा उद्धार".