आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो?
जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल.
दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता.
ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत.
काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!"
काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिही प्रश्न... करा एस एम एस!
अशीच आपली देशभक्ती... १ तोळा... १/२ तोळा!
आपण खरच प्रेम करतो आपल्य देशावर?
Comments