Skip to main content

ठाकर

हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन
केशरी मातीवर सोनेरी गोन्दून
सळसळत्या वार्‍याची सनई धून
पोपटी नक्शी एकमेकात गुंफून

इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार
ठेचांच्या पायावर काट्यांची धार
मळकट पातळात लेकराचे घर
भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार

रोजच यावे इथे लांब दूर दूरून
जंगलातली सामग्री न्यावी झोळी भरुन
लेकराले पाजवे त्याचेच दुध करुन
अन भाकरी खावी त्याचीच कुस्करून

देवाले सांगावे "ह्यो जंगलच आमचा आधार,
म्हाया लेकरास्नी खेळाया ह्याचेच घरदार,
सहरातुन धाडू नगस मिस्त्री नी विंजीनीयार,
कराया फाटलेल्या गोणपाटाचा उद्धार".

Comments

Popular posts from this blog

एक दिवस अचानक....

त्या दिवशी तर बॉस कमालच झाली मी चहा पीत असताना ती समोर दिसली नजरानजर होताच वाटल ती थोडीशी हसली मग मी ही न पाहिल्यागत करून मान माझी फिरवली वाराही त्या दिवशी जरा खट्याळ झाला होता कुरळ्या बटान्ना तीच्या वर वर उडवत होता ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता आणि तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता "वारा काय मस्त सुटलाय?" म्हटल जाउन बोलाव कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव टीम लीड नी पण का ह्याच वेळी पचकाव? अन महत्वाच काम म्हणून केबिन मधे न्याव? असो.... पुन्हा ती मला केन्टीन मधे भेटली योगायोगाने ती जेवयला मझ्यच समोर बसली पण ती बसताच समोर....टीम माझी उठली अन दैवानी माझी पुन्हा अशी फिरकी घेतली पुन्हा आजच भेटेल ह्याची मला खात्री वाटली जीव ओतून वाट पहायची नको ती सवय लागली पण आजवर ती पुन्हा मल कधीहि ना दिसली अन रेशमाची का काय म्हणतात ती गाठ बान्धण्या आधीच सुटली

आजी आजोबा दिवस

मला  अजुनही  कधितरी  वाटतं  … दार उघडून आत गेल्यावर आजी पेपर वाचत बसली असेल … किंवा दिवाणाशेजारी उभ्या जळीच्या कपाटातून काढत असेल पोथी कदाचित असेल ती “ रूचिरा ” पुस्तकात दिलेल्या वड्या करून बघण्याच्या तयारीत …. किंवा आमच्यासाठी असेल पुस्तकातू तोडगे उतरवून घेत अजोबाही कधितरी असेच आठवतात … त्यांचा चौकोनी चष्मा … दोन रिफिलचं पेन … पाण्यात घातल्यावर जांभळी होणारी शिसपेंसील … आणि तारीख लिहायची त्यांची अपुर्णांका सारखी पद्धत कधी बाल्कनीत उभा असल्यावर उगाच वाटतं की समोर रिक्षा थांबेल आणि आजोबा अपली बॅग घेऊन उतरतील …

लोहगड

लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते. मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड..‌. शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति. मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो. असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला. इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या...