लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते.
मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड... शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति.
मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो.
असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला.
इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या तटबंदीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरिपा चमकत होत्या.... दगड धोंड्याच्या रस्त्यावरून चालताना कल्पनाशक्ती अचाट वेगाने धावत होति... ४०० वर्षांपुर्वी शिवाजी महारज असेच आपल्या सारखे ह्यच रस्त्यवरून गेले असतील.... कदाचीत तेच दगड अजुनही इथेच पडलेले असतिल प्रतेक दगडाला महाराजंचे तेज अजुनही आठवत असेल कदाचित.... जर त्या दगडांची माती झाली असेल तर त्या मातिच्या कणन्नाही कदाचित आठवत असतील महाराज.
ह्या...इथुनच गेल्या असतील त्यांच्या तोफा...त्यांची सेना...त्यांचे घोडे....वरुन..तिथुन.. ही वाट अगदी स्पष्ट दिसत असेल...पहरेकरी नजर ठेवत असतिल तिथुन. रस्त्यात अजुनही काही चावऱ्या शाबुत आहेत जिथे बहुदा विश्रंतीची व्यवस्था असावी - छोटस महादेव मंदिर आणि बाजुला पाण्याचे रान्जण ठेवण्यासाठी जागा.
साधारण ९ किमी चालून/चढून गेल्यावर लोहगडवाडी लागते. तिथून किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. पायऱ्याही शाबुत आहेत. चढून जाताना दरवाज्याची रचना पाहिली के मन थक्क होत. पहिला दरवाजा अश्या तऱ्हेने बसवला आहे की कोणी तोफ डागली तरीही तीचा मारा दरवज्यापर्यंत पोहोचणार नाही. पाहिऱ्या दरवाज्याजवळ अश्या तर्हेने नागमोडी बसवल्या आहेत की जर कोणी लाकडच्या ओंडक्याने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर ते ही शक्य नाही आणि हत्तिला हि तिथे नेण शक्य नाहि... म्हणजे दरवाजा तोडणं केवळ अशक्यच! म्हणुनच कदाचित तो अजून शाबुत आहे.... भरीव लोखंडाची चौकट देखील तिथे लटकत आहे.... दर्जेदार कामची साक्श द्यायला
आत प्रवेश केल्यावर बुरुजान्वर नाक्की जावे....एका झरोक्यातून किती मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येउ शकते हे ह्यातून कळते.... मोजकेच बुरुज पण त्यातून किल्ल्याच्या सगळ्या बाजुला लक्श ठेवणे शक्य आहे.... केव्हडी ही बुद्धीमत्ता! गडावर पाण्यचे ७-८ हौद आहेत. त्यातल्या एका हौदात पिण्याचे पाणी अजुनही साच्छ आहे. तिथल्या पाण्याच्या एका घोटाची सर हजार बिस्लेरीना देखिल नाही यायची. घडीव बांधाच्या अष्टकोनी आणि दादषकोनी हऊदान्मध्ये पाण्यचे जिवंत स्त्रोत आहेत.
थोड पुढे गेल्यावर समोर विसापुर दिसतो.... एका तोफेची रेन्ज जर ३ किमी मानली तर अंदाज येउ शकतो की खरच तिथून इंग्रजानी तोफा डागल्या असतील.... इतका जवळ आहे विसापुर. पीर बाबांच्या समाधी जवळ काही बेजवाब्दार मुलानी एक तोफ उलटी उभी करुन ठेवली आहे.... आमच्या ग्रुप नि ति सरळ करायचा एक असफल प्रयत्न केला... कोणाला जमले तर क्रुपया ति सरळ करावी! महाराजंचे विचार नही तर निदान तोफ तरी सांभाळुयात!
गडाचा परिसर अतिप्रचंड आहे... विंचूकाटा हे गडाचे शेवटचे टोक....तिथे जाउन भगवा फडकवल्याशिवाय आम्हाला राहवले नाही.
Comments
"विचार नाहीतर तोफा ..." - हे आवडले :-)
बाकी एक टीप - क्ष <- kSh