Skip to main content

आजी आजोबा दिवस

मला अजुनही कधितरी वाटतं 

दार उघडून आत गेल्यावर आजी पेपर वाचत बसली असेल

किंवा दिवाणाशेजारी उभ्या जळीच्या कपाटातून काढत असेल पोथी

कदाचित असेल तीरूचिरापुस्तकात दिलेल्या वड्या करून बघण्याच्या तयारीत….

किंवा आमच्यासाठी असेल पुस्तकातू तोडगे उतरवून घेत

अजोबाही कधितरी असेच आठवतात

त्यांचा चौकोनी चष्मादोन रिफिलचं पेन

पाण्यात घातल्यावर जांभळी होणारी शिसपेंसील

आणि तारीख लिहायची त्यांची अपुर्णांका सारखी पद्धत

कधी बाल्कनीत उभा असल्यावर उगाच वाटतं की समोर रिक्षा थांबेल आणि आजोबा अपली बॅग घेऊन उतरतील

Comments

Popular posts from this blog

लोहगड

लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते. मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड..‌. शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति. मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो. असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला. इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या...

क्षण

त्या संध्याकाळची भेट तुझी अजून स्मरणात आहे मोहरून अवघी काया अजून शहारत आहे केस होते किंचीत ओले.... गालवर ओघळलेले पापण्यान्वर काळ्याभोर.... दवबींदू साचलेले हलकेच होती तुझ्या आली.... गालवरती लाली ओठ तुझे भिजलेले.... माझ्या ओठाखाली! संकोचाने जेव्हा तू... हात सोडवून घेतले झटक्यात वेडे माझ्यातून.... तू मला ओढून घेतले! कस सांगू तुला.... तू काय जादू केली आयुष्यभराची कलकल.... पावसात विरघळून गेली