Tuesday, February 25, 2014

mi majhaa....

कोणी विचारा मला "मी जगतो कसा?"
मी म्हणेन पावातल्या वडाजसा
स्वादिष्ट, रुचकर, खमंग असा
पोटभर खा वाट्टेलतसा

जरी असेल मी पावात दाबलेला
चटणी, मिरचीनी तिखट केलेला
उकडुन, तळुन, शिजवुन काढलेला
तरीही चिन्चा आणि गुळात बुडलेला

मज विचारा मी इतका चवदार कसा?
मी म्हणेन त्यासाठी आधी कूकर मधे बसा
मग उकळत्या तेलात पोहुन घ्या जरासा
आणी पावाच्या दाढेत जाऊन बसा

समजू नका मजवरी देव कोपला
बघा खजुरही वाळवंटी जन्मला
जो कोणी आगीतुन नाही निघाला
कुन्दनाची सर कधी नाही येणार त्याला

Tuesday, October 21, 2008

क्षण

त्या संध्याकाळची भेट तुझी अजून स्मरणात आहे

मोहरून अवघी काया अजून शहारत आहे

केस होते किंचीत ओले.... गालवर ओघळलेले

पापण्यान्वर काळ्याभोर.... दवबींदू साचलेले

हलकेच होती तुझ्या आली.... गालवरती लाली

ओठ तुझे भिजलेले.... माझ्या ओठाखाली!

संकोचाने जेव्हा तू... हात सोडवून घेतले

झटक्यात वेडे माझ्यातून.... तू मला ओढून घेतले!

कस सांगू तुला.... तू काय जादू केली

आयुष्यभराची कलकल.... पावसात विरघळून गेली

एक तोळा देशभक्ती

आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो?

जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल.

दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता.

ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत.

काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!"

काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिही प्रश्न... करा एस एम एस!

अशीच आपली देशभक्ती... १ तोळा... १/२ तोळा!

आपण खरच प्रेम करतो आपल्य देशावर?

Tuesday, February 26, 2008

लोहगड

लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते.

मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड..‌. शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति.

मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो.

असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला.

इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या तटबंदीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरिपा चमकत होत्या.... दगड धोंड्याच्या रस्त्यावरून चालताना कल्पनाशक्ती अचाट वेगाने धावत होति... ४०० वर्षांपुर्वी शिवाजी महारज असेच आपल्या सारखे ह्यच रस्त्यवरून गेले असतील.... कदाचीत तेच दगड अजुनही इथेच पडलेले असतिल प्रतेक दगडाला महाराजंचे तेज अजुनही आठवत असेल कदाचित.... जर त्या दगडांची माती झाली असेल तर त्या मातिच्या कणन्नाही कदाचित आठवत असतील महाराज.

ह्या...इथुनच गेल्या असतील त्यांच्या तोफा...त्यांची सेना...त्यांचे घोडे....वरुन..तिथुन.. ही वाट अगदी स्पष्ट दिसत असेल...पहरेकरी नजर ठेवत असतिल तिथुन. रस्त्यात अजुनही काही चावऱ्या शाबुत आहेत जिथे बहुदा विश्रंतीची व्यवस्था असावी - छोटस महादेव मंदिर आणि बाजुला पाण्याचे रान्जण ठेवण्यासाठी जागा.

साधारण ९ किमी चालून/चढून गेल्यावर लोहगडवाडी लागते. तिथून किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. पायऱ्याही शाबुत आहेत. चढून जाताना दरवाज्याची रचना पाहिली के मन थक्क होत. पहिला दरवाजा अश्या तऱ्हेने बसवला आहे की कोणी तोफ डागली तरीही तीचा मारा दरवज्यापर्यंत पोहोचणार नाही. पाहिऱ्या दरवाज्याजवळ अश्या तर्हेने नागमोडी बसवल्या आहेत की जर कोणी लाकडच्या ओंडक्याने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर ते ही शक्य नाही आणि हत्तिला हि तिथे नेण शक्य नाहि... म्हणजे दरवाजा तोडणं केवळ अशक्यच! म्हणुनच कदाचित तो अजून शाबुत आहे.... भरीव लोखंडाची चौकट देखील तिथे लटकत आहे.... दर्जेदार कामची साक्श द्यायला

आत प्रवेश केल्यावर बुरुजान्वर नाक्की जावे....एका झरोक्यातून किती मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येउ शकते हे ह्यातून कळते.... मोजकेच बुरुज पण त्यातून किल्ल्याच्या सगळ्या बाजुला लक्श ठेवणे शक्य आहे.... केव्हडी ही बुद्धीमत्ता! गडावर पाण्यचे ७-८ हौद आहेत. त्यातल्या एका हौदात पिण्याचे पाणी अजुनही साच्छ आहे. तिथल्या पाण्याच्या एका घोटाची सर हजार बिस्लेरीना देखिल नाही यायची. घडीव बांधाच्या अष्टकोनी आणि दादषकोनी हऊदान्मध्ये पाण्यचे जिवंत स्त्रोत आहेत.

थोड पुढे गेल्यावर समोर विसापुर दिसतो.... एका तोफेची रेन्ज जर ३ किमी मानली तर अंदाज येउ शकतो की खरच तिथून इंग्रजानी तोफा डागल्या असतील.... इतका जवळ आहे विसापुर. पीर बाबांच्या समाधी जवळ काही बेजवाब्दार मुलानी एक तोफ उलटी उभी करुन ठेवली आहे.... आमच्या ग्रुप नि ति सरळ करायचा एक असफल प्रयत्न केला... कोणाला जमले तर क्रुपया ति सरळ करावी! महाराजंचे विचार नही तर निदान तोफ तरी सांभाळुयात!

गडाचा परिसर अतिप्रचंड आहे... विंचूकाटा हे गडाचे शेवटचे टोक....तिथे जाउन भगवा फडकवल्याशिवाय आम्हाला राहवले नाही.

Friday, December 14, 2007

ठाकर

हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन
केशरी मातीवर सोनेरी गोन्दून
सळसळत्या वार्‍याची सनई धून
पोपटी नक्शी एकमेकात गुंफून

इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार
ठेचांच्या पायावर काट्यांची धार
मळकट पातळात लेकराचे घर
भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार

रोजच यावे इथे लांब दूर दूरून
जंगलातली सामग्री न्यावी झोळी भरुन
लेकराले पाजवे त्याचेच दुध करुन
अन भाकरी खावी त्याचीच कुस्करून

देवाले सांगावे "ह्यो जंगलच आमचा आधार,
म्हाया लेकरास्नी खेळाया ह्याचेच घरदार,
सहरातुन धाडू नगस मिस्त्री नी विंजीनीयार,
कराया फाटलेल्या गोणपाटाचा उद्धार".

Monday, May 14, 2007

एक दिवस अचानक....

त्या दिवशी तर बॉस कमालच झाली
मी चहा पीत असताना ती समोर दिसली
नजरानजर होताच वाटल ती थोडीशी हसली
मग मी ही न पाहिल्यागत करून मान माझी फिरवली

वाराही त्या दिवशी जरा खट्याळ झाला होता
कुरळ्या बटान्ना तीच्या वर वर उडवत होता
ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता
आणि तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता

"वारा काय मस्त सुटलाय?" म्हटल जाउन बोलाव
कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव
टीम लीड नी पण का ह्याच वेळी पचकाव?
अन महत्वाच काम म्हणून केबिन मधे न्याव?

असो....

पुन्हा ती मला केन्टीन मधे भेटली
योगायोगाने ती जेवयला मझ्यच समोर बसली
पण ती बसताच समोर....टीम माझी उठली
अन दैवानी माझी पुन्हा अशी फिरकी घेतली

पुन्हा आजच भेटेल ह्याची मला खात्री वाटली
जीव ओतून वाट पहायची नको ती सवय लागली
पण आजवर ती पुन्हा मल कधीहि ना दिसली
अन रेशमाची का काय म्हणतात ती गाठ बान्धण्या आधीच सुटली