लोकलाच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले कि हजारो पाय माझ्य पायाचा मुका घेत होते. गर्दिने तर माझी दामटिच वळली होती. पण तिथे लक्श द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझ लक्श होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडला जाण्यसाठी इथेच उतरावे लागते. मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड... शिवाजी महराजांचा एक किल्ला.... ४५०० फुट उंच.... तटबंदी अजुनही शाबुत असलेला...वगेर वगेरे...काल "विकिपिडिया" वर महिती वाचली होति. मळवली स्टेशन तस छोटस स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो अहे का ते पाहिल.... खरतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तस अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजिटल कॅमेरा घरिच विसरून आलो होतो. असो....रोल घेउन सहज वर पाहिल तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापुर आणि लोहगड - एक ४६०० फुट आणि दुसरा ४५०० फुट. इंग्रजानी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेउन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला. इतिहास मधुन-अधून मनत डोकावत होता.... विसापुरच्या...