Skip to main content

Posts

Showing posts from December, 2007

ठाकर

हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन केशरी मातीवर सोनेरी गोन्दून सळसळत्या वार्‍याची सनई धून पोपटी नक्शी एकमेकात गुंफून इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार ठेचांच्या पायावर काट्यांची धार मळकट पातळात लेकराचे घर भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार रोजच यावे इथे लांब दूर दूरून जंगलातली सामग्री न्यावी झोळी भरुन लेकराले पाजवे त्याचेच दुध करुन अन भाकरी खावी त्याचीच कुस्करून देवाले सांगावे "ह्यो जंगलच आमचा आधार, म्हाया लेकरास्नी खेळाया ह्याचेच घरदार, सहरातुन धाडू नगस मिस्त्री नी विंजीनीयार, कराया फाटलेल्या गोणपाटाचा उद्धार".