Skip to main content

Posts

Showing posts from 2007

ठाकर

हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन केशरी मातीवर सोनेरी गोन्दून सळसळत्या वार्‍याची सनई धून पोपटी नक्शी एकमेकात गुंफून इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार ठेचांच्या पायावर काट्यांची धार मळकट पातळात लेकराचे घर भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार रोजच यावे इथे लांब दूर दूरून जंगलातली सामग्री न्यावी झोळी भरुन लेकराले पाजवे त्याचेच दुध करुन अन भाकरी खावी त्याचीच कुस्करून देवाले सांगावे "ह्यो जंगलच आमचा आधार, म्हाया लेकरास्नी खेळाया ह्याचेच घरदार, सहरातुन धाडू नगस मिस्त्री नी विंजीनीयार, कराया फाटलेल्या गोणपाटाचा उद्धार".

एक दिवस अचानक....

त्या दिवशी तर बॉस कमालच झाली मी चहा पीत असताना ती समोर दिसली नजरानजर होताच वाटल ती थोडीशी हसली मग मी ही न पाहिल्यागत करून मान माझी फिरवली वाराही त्या दिवशी जरा खट्याळ झाला होता कुरळ्या बटान्ना तीच्या वर वर उडवत होता ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता आणि तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता "वारा काय मस्त सुटलाय?" म्हटल जाउन बोलाव कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव टीम लीड नी पण का ह्याच वेळी पचकाव? अन महत्वाच काम म्हणून केबिन मधे न्याव? असो.... पुन्हा ती मला केन्टीन मधे भेटली योगायोगाने ती जेवयला मझ्यच समोर बसली पण ती बसताच समोर....टीम माझी उठली अन दैवानी माझी पुन्हा अशी फिरकी घेतली पुन्हा आजच भेटेल ह्याची मला खात्री वाटली जीव ओतून वाट पहायची नको ती सवय लागली पण आजवर ती पुन्हा मल कधीहि ना दिसली अन रेशमाची का काय म्हणतात ती गाठ बान्धण्या आधीच सुटली