मला अजुनही कधितरी वाटतं … दार उघडून आत गेल्यावर आजी पेपर वाचत बसली असेल … किंवा दिवाणाशेजारी उभ्या जळीच्या कपाटातून काढत असेल पोथी कदाचित असेल ती “ रूचिरा ” पुस्तकात दिलेल्या वड्या करून बघण्याच्या तयारीत …. किंवा आमच्यासाठी असेल पुस्तकातू तोडगे उतरवून घेत अजोबाही कधितरी असेच आठवतात … त्यांचा चौकोनी चष्मा … दोन रिफिलचं पेन … पाण्यात घातल्यावर जांभळी होणारी शिसपेंसील … आणि तारीख लिहायची त्यांची अपुर्णांका सारखी पद्धत कधी बाल्कनीत उभा असल्यावर उगाच वाटतं की समोर रिक्षा थांबेल आणि आजोबा अपली बॅग घेऊन उतरतील …