Skip to main content

Posts

Showing posts from February, 2014

mi majhaa....

कोणी विचारा मला "मी जगतो कसा?" मी म्हणेन पावातल्या वडाजसा स्वादिष्ट, रुचकर, खमंग असा पोटभर खा वाट्टेलतसा जरी असेल मी पावात दाबलेला चटणी, मिरचीनी तिखट केलेला उकडुन, तळुन, शिजवुन काढलेला तरीही चिन्चा आणि गुळात बुडलेला मज विचारा मी इतका चवदार कसा? मी म्हणेन त्यासाठी आधी कूकर मधे बसा मग उकळत्या तेलात पोहुन घ्या जरासा आणी पावाच्या दाढेत जाऊन बसा समजू नका मजवरी देव कोपला बघा खजुरही वाळवंटी जन्मला जो कोणी आगीतुन नाही निघाला कुन्दनाची सर कधी नाही येणार त्याला